स्पृहा !!!




0 comments:

एक सुंदर प्रेमकथा

एक सुंदर प्रेमकथा

  अंकीता आणि शुभम हे लायब्ररीत बसलेत. अंकीताला वाचनाची आवड आहे तर शुभमला मोबाईल चॅटची..वाचचाना तिचं थोडं लक्ष शुभमवर जातं.तो मोबाईलमध्ये डोळे घालुन बसलाय.अंकीता त्याला सहजच म्हणते, i love u. हे ऐकताच शुभमने समोर बघत फोन कडेला ठेवुन दिला.आणि म्हणाला, हो मला माहीतीये.पण,तु मला सारखी सारखी याची जाणीव का करुन देतेस..
अंकीताःयाची दोन कारणं आहेत,एकतर तुला माझ्या प्रेमाची जाणीव झाली पाहीजे. आ...णि दुसरं म्हणजे तु अशावेळी तुझा फोन बाजुला ठेवुन माझ्याशी बोलु लागतोस.जे मला हवं असतं.आणखी एक कारण आहे ते म्हणजे,या तीन शब्दात एक जादु आहे.जेव्हा भविष्यात कधीतरी आपण वेगळे व्हायची वेळ आली तर हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.
शुभम तिच्या हातातलं.पुस्तक हिसकावुन घेतो.आणि म्हणतो,मला तेवढे टोमणे मारशील मोबाईल या मुद्द्यावरुन.पण तु तेवढं तेच तेच हे रोमियो ज्युलीएटचं पुस्तक कितीवेळा वाचशील?
अंकिताःहे पुस्तक माझ्यासाठी खुपच खास आहे.आणि तुलाही भविष्यात याच पुस्तकाची गरज पडेल कधीतरी.
शुभमः छे छे कधीच नाही पडणार गरज..,bt i love 2
अंकीताः i know...
मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की,त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. bt कहानीमेँ twist जरुरी है बॉस..तोच इथे सुरु होतोय.चला तर मग तोच अनुभवुया.काही दिवसांनंतर
रोज कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज कॉलेजवर आलीच नाही गेली दोन तास शुभम तिची वाट पाहतोय.तिचा फोनही स्वीच ऑफ आहे.
तो तिच्या घरी जातो.पण तिच्या घराला कुलुप आहे.शुभमला काही सुचत नाही.आजपर्यँत कुठेही पहीला मला सांगुन जाणारी अंकीता आज मला न सांगताच कुठे निघुन गेली.या चिँतेने शुभम खुपच व्याकुळ झाला. त्याला काही सुचतच नव्हते.त्याला ही गोष्ट पटतच नसते की, अंकिताने माझ्यासाठी काहीच मॅसेज सोडला नाही. थोडा विचार केल्यावर त्याला एक गोष्ट आठवते.तो बाईक स्टार्ट करतो आणि लायब्ररीवर जातो.तिथे चौकशी केल्यावर कळतं की,अंकीता सकाळी लवकर इथे येऊन गेलीय.त्याला ती वाचत असलेल्या रोमियो ज्युलिएट या पुस्तकाची आठवण होते.तो ते पुस्तक उघडतो.पुस्तकात त्याची शोधाशोध सुरु होते.पण त्यात काहीच त्याला सापडत नाही.तेवढ्यात त्याला अंकीताची ती लाईन आठवते जेव्हा तिने म्हटलं होतं,कि जेव्हा भविष्यात आपण वेगळे होण्याची परिस्थिती येईल तेव्हा i love you हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.त्याला काहीतरी सुचतं.तो पुन्हा तेच पुस्तक उघडतो आणि बरोबर त्यातलं 143(I LOVE YOU=143)नं चं पान उघडतो.ते पान चिकटवलेलं असतं.ते पान तो एका बाजुने फाडतो.त्यात एक चिठ्ठी असते.त्यात लिहीलेलं असतं,
मला माहीती होतं शुभम तु येथवर पोहोचशील.कारण हे माझ्या प्रेमाचं नशीब होतं.आता तुझ्या प्रेमाच नशीब काय आहे ते पाहायचंय.जेव्हा तुझ्या हातात हे पत्र पडेल तोपर्यँत कदाचित मी कलकत्याला पोहोचलीही असेन.माझी 11:30ची ट्रेन आहे.काल पप्पांचं पत्र आलं होतं त्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय.आज तातडीने यायला सांगितलंय.मला माझं नशीब आजमावायचंय.तु माझ्या नशीबात आहेस की तो मुलगा माझ्या नशिबात आहे....तुझी अंकीता
साडेअकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटे कमी असतात.रेल्वेस्टेशनपर्यँतचं अंतर अर्धा तासाचं असतं.शुभम आपल्या बाईकवर बसुन भन्नाट वेगाने रेल्वेस्टेशनकडे निघाला.अर्ध्या तासाचं अंतर त्याने फक्त सतरा मिनिटांत पुर्ण केलं.त्याने बाईक तिथेच सोडली आणि धावत धावत रेल्वेस्थानकावर अंकीताला शोधु लागला.चौकशीअंती कळालं की कलकत्याची रेल्वे दोनच मिनिटांपुर्वी निघालीय.तो खुपच निराश झाला. त्याचं दुःख अश्रुरुपाने डोळ्यात भरुन आलं.त्याचं नशीब त्याला दगा देऊन गेलं होतं. तो त्याच नैराश्यावस्थेत तिथल्या एका बँचवर बसुन राहीला.तेवढ्यात एक अलगद हात त्याच्या खांद्यावर पडला त्याने मागे वळुन पाहीले. तर ती अंकीताची एक मैत्रीण होती.ती म्हणाली अंकिता तुझ्यासाठी काहीतरी देउन गेलीय.
तो म्हणाला,काय?
तीःते तु अंकीतालाच विचार.. ती बाजुला झाली तिच्या मागे अंकिताच उभी होती.अंकिताला पाहताच त्याचे हुंदके अनावर झाले आणि तो अंकीताला मिठी मारुन रडु लागला.
अंकिताने योग्य तो निर्णय घेतला होता.शुभमला सोडुन न जाण्याचा, कारण तिने बुद्धीनं नाही.मनाने निर्णय घेतला होता, म्हणुनच तर ट्रेन निघुन गेली पण, अंकीता नाही...

मित्रांनो आजवर घडलेल्या ९०% प्रेमकथांचा अंत यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध होतो.मुली शेवटच्या क्षणी वडीलांचं ऐकुन किँवा त्यांचा विचार करुन बुद्धीने निर्णय घेतात.आणि मनातल्या भावनांना दाबुन टाकतात.. कधीकधी याचा खुप मोठा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो. Friends मी कोणाविरुद्ध तक्रार करत नाही. मला फक्त एवढंच सांगायचंय,
"दिलके मामले में हमेशा दिलकी सुनो,ना की दिमागकी"
♥♥♥

- अमेय बावणे

0 comments:

'तो' क्षण...पुनर्मिलापाचा....!!

Eka Lagnachi Tisari Goshta
अखेर 'तो' क्षण आला. माहित होतं की ईशा आणि ओम परत एकत्र येणार, या सुंदर जोडीचा पुनर्मिलाप होणार, गैरसमजुतींच्या आघातामुळे कोमेजून गेलल हे प्रेमाचं फुल पुन्हा फुलणार. त्यामुळे असं जाणवत होतं की आनंदच होणार पण दारात अपराधी भावनेने उभ्या असलेल्या इशाच्या पाणावलेल्या डोळ्यातली पश्चातापाची भावना आणि ओमच्या मिठीत स्वतःला घट्ट आवळून घेण्याची तीव्र इच्छा दिसली आणि माझ्या मनातल्या भावना अनावर होऊ लागल्या आणि जेंव्हा इशाने ओमला मिठी मारली तेंव्हा तर त्या भावनांचा उद्रेक झाला आणि आनंदाश्रू नाही आवरता आले. व्यावहारिक जीवनशैलीची झालर चढवलेल्या वस्त्रांचा पेहराव करून या भावनाशुन्य जगात मी स्वतःला मिरवण्याचा सतत प्रयत्न करतो पण मग ELTG सारखी कलाकृती आणि उमेश आणि स्पृहा सारखे ओम आणि इशाच्या व्यक्तिरेखेला अक्षरशः जिवंत करणारे कलाकार जेंव्हा समोर येतात तेंव्हा मात्र 'ती' वस्त्रं कुठेतरी माझ्यातल्या भावनिक माणसाला गुदमरून टाकतात आणि मग एकदा तरी प्रेमात पडून बघावं अशी सुप्त इच्छा वाढीस लागते. असो, मात्र Spruha Shirish Joshi जेंव्हा स्वतःवर चिडून आपल्या गालावर जोरात आघात करत होती तेंव्हा त्रास आम्हाला होत होता, कारण आता आधीची निरागस इशा परतल्याची जाणीव झाली होती. काय तो अप्रतिम अभिनय म्हणावा, ज्यात स्वतःला मारताना बघणार्यालाही त्याची झळ पोहचावी इतकी त्या आवाजाची तीव्रता !!! Anyway, काय मग...खुश ना सगळे...कृष्ण-कमल वर आता दुखांच सावट हळूहळू दूर होईल अशी आशा आहे. आता पुढे काय... ह्याची उत्सुकता निर्माण झाली आहे कारण ओमची आई येणार आहे असं कळल्यावर मला तर आसावरी जोशींना ओमची आई म्हणून बघण्याची इच्छा निर्माण झाली आहे. माफ करा, as a member गेल्या काही दिवसात मला आपल्या कुटुंबात आपले अभिप्राय मांडायचा वेळ नाही मिळाला आणि यापुढे ही तो किती frequently असेल याची खात्री नाही पण हो...आपल्या इतर membersच्या छान postsबद्दल धन्यवाद !!! आपल्या या कुटुंबाची सदैव भरभराट होवो अशी सदिच्छा !!!!

- निलेश बोऱ्हाडे

0 comments:

F. A. Q.

Aapla Sagla Same Aahe!


* फेसबूक ग्रूपवर पोस्ट करण्यासाठीचे नियम व अटी *

• एका लग्नाची तिसरी गोष्ट मालिकेविषयी किंवा मूळ विषयाशी संदर्भातच पोस्ट असाव्यात
• दिवसाला एका सदस्याने दोन पेक्षा जास्त पोस्ट करू नये (जास्त असल्यास Delete केल्या जातील हे लक्षात घ्यावे)
• कविता किंवा साहित्य पोस्ट करायचे असल्यास मूळ लेखकाला Credit द्यावे (स्वतः लिहिले असेल तर ब्लॉगसाठी SUBMIT करावे, लेख तुमच्या CREDITS सह पब्लीश केला जाईल)
• फोटोस CREDITS सह पोस्ट करावे, मूळ फोटोग्राफर माहीत नसल्यास 'UNKNOWN' म्हणून पोस्ट करावे
• जर तुम्हाला ग्रूपबद्दल काही SUGGESSIONS OR COMPLAINTS असतील तर ते ADMINS ना सांगावे.. परस्पर वाद होईल असे काही करू नये
• पोस्ट शक्यतो मराठी मध्ये कराव्यात
• तुमचा FRIENDS ना ADD करण्या आधी त्यांना ग्रूपची पूर्ण कल्पना द्यावी आणि मगच ADD करावे
• नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या सदस्यास वगळण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी
• तुमचे सहकार्य हीच आमची अपेक्षा !

****************************
© आपलं सगळं सेम आहे!

0 comments:

आम्हाला तुमचा लेख पाठवा

Write For Us



"आम्हाला तुमचा लेख पाठवा"


मित्रांनो, आपल्या सगळ्यांमधेच खूप सार्‍या कला असतात. काही उघड असतात आणि काही आपल्या पर्यंत मर्यादित असतात. लेखन ही अशी कला आहे की जी आपल्या मनाचे दरवाजे उघडते आणि त्याचवेळी इतरांच्या विचारांना ही समृद्ध करते. पण आपलं लेखन कोणी COPY करू नये याची भीती आपल्याला असते. म्हणूनच आपण एका नवीन माध्यमातून विचारांची देवाण घेवाण करणार आहोत जेणेकरून लेखकाला त्याचे CREDIT ही मिळेल आणि विचारांचे प्रवाह सर्वांना समृद्ध करतील.

*लेख ईमेल द्वारा पाठवावा Email ID : aaplasameaahe@gmail.com
मेल मध्ये कृपया खालील गोष्टी आवर्जून लिहा
• तुमचे संपूर्ण नाव
• तुमचे वय
• राहण्याचे ठिकाण
• ईमेल ID
(तुमची माहिती SPAM होणार नाही याची खात्री आमची)

*लेख ब्लॉग वर Publish करण्यासाठीचे नियम व अटी
• लेखन कॉपी राइट स्वतःचे असावे.
• लेख देवनागरी फॉंट मधे असावा, रोमन इंग्रजी चालणार नाही
• लेखन विषय कोणताही चालेल पण Violent विषय Publish केला जाणार नाही.
• समीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.


Snehal Wagh

****************************
© आपलं सगळं सेम आहे!

0 comments:

1000+ सदस्य

Eka Lagnachi Tisari Goshta

नमस्कार… _/\_
कालच एका लग्नाची तिसरी गोष्ट चा 100 वा एपिसोड होता आणि Twitter Handle ला 100 फोलोवर्स कंप्लीट झाले. आणि आज एक नवीन आनंदाची बातमी आहे की आपल्या कुटुंबात 1000 पेक्षा जास्त सदस्य सहभागी झाले आहेत.
आपली 1000 वी भाग्यवान सदस्य आहे Rutuja R Patil.
सर्वांचे अभिनंदन व आभार !
आपले कुटुंब असेच प्रेमाने वाढवूया व जपूया कारण आपलं सगळं सेम आहे !

Snehal Wagh


0 comments:

शोध सुखाचा...

Happiness - Aapla Sagla Same Aahe!


माणसे नेहमी सुखाच्या शोधत असतात. आपल्याला आनंद कुठे मिळेल हे पाहात असतात. काहींना भौतिक आणि ऐहिक सुखे हवी असतात. काहींचे हे मिळूनही समाधान होत नाही. त्यांना मानसिक, भावनिक, वैचारिक आनंद देणारे काहीतरी हवे असते. अशा आनंदासाठी स्वतःच लेखक, कवी, कलावंत असण्याची गरज नसते. निर्मितीपेक्षा निर्मितीचा आस्वाद त्यांच्या आयुष्यात आनंदाची झुळूक बनून येतो. मग ते लिहित नसले तरी वाचतात, गात नसले तरी ऐकतात, काही सादर करीत नसले तरी पाहतात. या आपल्या अवतीभवतीच्या माणसांनी त्यांच्या त्यांच्यापुरते एक सुखाचे तळे शोधलेले असते. त्या तळ्याकाठी ते मग्न होतात. नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य, क्रीडा, व्याख्याने, रांगोळी, आकाशदिवे, कुणाला गुपचूप आर्थिक मदत, कुठे श्रमसेवा अशा अनेक गोष्टी त्यांना सुखावतात. अर्थात, मनोमन!

- वासंती साटम

0 comments: