'तो' क्षण...पुनर्मिलापाचा....!!

Eka Lagnachi Tisari Goshta
अखेर 'तो' क्षण आला. माहित होतं की ईशा आणि ओम परत एकत्र येणार, या सुंदर जोडीचा पुनर्मिलाप होणार, गैरसमजुतींच्या आघातामुळे कोमेजून गेलल हे प्रेमाचं फुल पुन्हा फुलणार. त्यामुळे असं जाणवत होतं की आनंदच होणार पण दारात अपराधी भावनेने उभ्या असलेल्या इशाच्या पाणावलेल्या डोळ्यातली पश्चातापाची भावना आणि ओमच्या मिठीत स्वतःला घट्ट आवळून घेण्याची तीव्र इच्छा दिसली आणि माझ्या मनातल्या भावना अनावर होऊ लागल्या आणि जेंव्हा इशाने ओमला मिठी मारली तेंव्हा तर त्या भावनांचा उद्रेक झाला आणि आनंदाश्रू नाही आवरता आले. व्यावहारिक जीवनशैलीची झालर चढवलेल्या वस्त्रांचा पेहराव करून या भावनाशुन्य जगात मी स्वतःला मिरवण्याचा सतत प्रयत्न करतो पण मग ELTG सारखी कलाकृती आणि उमेश आणि स्पृहा सारखे ओम आणि इशाच्या व्यक्तिरेखेला अक्षरशः जिवंत करणारे कलाकार जेंव्हा समोर येतात तेंव्हा मात्र 'ती' वस्त्रं कुठेतरी माझ्यातल्या भावनिक माणसाला गुदमरून टाकतात आणि मग एकदा तरी प्रेमात पडून बघावं अशी सुप्त इच्छा वाढीस लागते. असो, मात्र Spruha Shirish Joshi जेंव्हा स्वतःवर चिडून आपल्या गालावर जोरात आघात करत होती तेंव्हा त्रास आम्हाला होत होता, कारण आता आधीची निरागस इशा परतल्याची जाणीव झाली होती. काय तो अप्रतिम अभिनय म्हणावा, ज्यात स्वतःला मारताना बघणार्यालाही त्याची झळ पोहचावी इतकी त्या आवाजाची तीव्रता !!! Anyway, काय मग...खुश ना सगळे...कृष्ण-कमल वर आता दुखांच सावट हळूहळू दूर होईल अशी आशा आहे. आता पुढे काय... ह्याची उत्सुकता निर्माण झाली आहे कारण ओमची आई येणार आहे असं कळल्यावर मला तर आसावरी जोशींना ओमची आई म्हणून बघण्याची इच्छा निर्माण झाली आहे. माफ करा, as a member गेल्या काही दिवसात मला आपल्या कुटुंबात आपले अभिप्राय मांडायचा वेळ नाही मिळाला आणि यापुढे ही तो किती frequently असेल याची खात्री नाही पण हो...आपल्या इतर membersच्या छान postsबद्दल धन्यवाद !!! आपल्या या कुटुंबाची सदैव भरभराट होवो अशी सदिच्छा !!!!

- निलेश बोऱ्हाडे

0 comments: